आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गोंदूर येथे कृषी विभागातर्फे कापूस शेती कार्यशाळा झाली. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ मूल्य साखळी योजनेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, कृषी मंडळ अधिकारी एम. वानखेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी कापूस पिकाबद्दल एस. डी. मालपुरे यांनी मार्गदर्शन केले. मित्र व शत्रू किडीची ओळख कशी करावी, कापसामध्ये फेरोमन सापळे कसे लावावे, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आली. निंबोळी अर्काच्या फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. परसबागेसाठी भाजीपाला बियाण्यांचे अंगणवाडी सेविकांना वाटप करण्यात आले. या वेळी किशोर भदाणे, माजी सरपंच सखाराम पाटील, जवाहर सूतगिरणीचे संचालक सचिन भदाणे, कैलास पाटील, चेतन पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.