आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षांचा वाढदिवस:जि.प. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसाेबत केक कापून केला वृक्षांचा वाढदिवस साजरा

बोरद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा समाजामध्ये आहे. मात्र अमोनी, ता. तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षाचा अनोखा असा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच शाळेत तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षाराेपण करण्यात आले हाेते. ते वृक्ष आता वाढून मोठे झाले आहेत. त्या वृक्षांचा वाढदिवस जि.प. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून उत्साहात साजरा केला.

३१ जुलै अमोनी जिल्हा परिषद शाळेत गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी जि.प. अध्यक्ष ॲड.वळवी, संजय गांधी निराधार योजना समितीच्या माजी सदस्या निशा वळवी, केंद्रप्रमुख डॉ.जयश्री बागले उपस्थित हाेत्या. यावेळी माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश व क्रीडा गणवेशांचे वाटप तसेच गावातील दानशूराच्या सहकार्यातून प्राप्त शैक्षणिक साहित्य ज्यात राजापाटी, अंकलिपी पुस्तके, वह्या, रंगीत खडू, लेखन साहित्य आदीचे वाटप मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना डिजिटल व संगणक साक्षरतेचे ज्ञान मिळावे यासाठी शाळेत तयार केलेल्या संगणक कक्षाचेही उद्घाटन मान्यवरांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व त्यांनी सादर केलेले नृत्य, त्यांच्यातील गुणवत्ता पाहून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोनी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नुकसानग्रस्त भिंत, धाेकादायक खाेलीची पाहणी
पावसामुळे नुकसानग्रस्त झालेली शाळेची आवार भिंत, धोकादायक झालेली वर्ग खोली यांची उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच शाळा विकासाबाबतच्या पूर्ततेचे देखील आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...