आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वज खरेदी:जि.प. ग्रामपंचायत विभागाने मागवले ८८ हजार राष्ट्रध्वज

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागावर आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभागाने ८८ हजार राष्ट्रध्वज मागवले आहे. तसेच पंचायत समितीस्तरावरही राष्ट्रध्वज खरेदी करण्यात येऊन ते ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतही राष्ट्रध्वज खरेदी करणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील २ लाख ९३ हजार २०५ घरांवर राष्ट्रध्वज फडकणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत विभागाने ८८ हजार राष्ट्रध्वजांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यापैकी ६० हजार ध्वज आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. ते पंचायत समितीस्तरावर वितरित झाले आहे. प्रत्येक पंचायत समितीने ध्वज खरेदी केले आहे. त्यानुसार धुळे पंचायत समितीने १४ हजार ९००, साक्री पंचायत समितीने १० हजार ७०० तर शिरपूर पंचायत समितीने ११ हजार, शिंदखेडा पंचायत समितीने १३ हजार ध्वज घेतले आहे. पंचायत समितीस्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १०० ध्वज देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...