आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा प्रभाव कमी:ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला बसेल फटका

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला असून, ढगाळ वातावरण काही दिवस कायम राहिले तर हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, दुपारी उकाडा जाणवतो. शहरात रविवारी रात्री कमाल तापमान ३२ तर किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस होते. ढगाळ वातावरणाचा गव्हावर परिणाम होणार नाही पण हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...