आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार:जिल्ह्यात ग्रामनिधी; जवाहर रोजगार योजनेंतर्गत 83 प्रकरणांमध्ये अपहार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​शासनाच्या जवाहर रोजगार योजनेसह ग्रामनिधीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. धुळे तालुक्यात ग्रामनिधीअंतर्गत ४३ आणि जवाहर रोजगार योजनेंतर्गत ४० अशा ८३ प्रकरणांमध्ये १ कोटी ९८ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी एप्रिल महिन्यात १५ प्रकरणांमध्ये ३२ लाख ७५ हजारांची वसुली झाली. अद्याप ६३ प्रकरणांमध्ये कारवाई नाही.

ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाकडून ग्रामनिधी देण्यात येतो. ग्रामनिधी योग्य कामांवर खर्च होणे आवश्यक आहे. पण काही ग्रामपंचायतींमध्ये हा निधी चुकीच्या पद्धतीने खर्च केला जातो. ग्रामनिधीत अपहाराची ४३ प्रकरणे धुळे तालुक्यात समोर आली. सुमारे १ कोटी ४७ लाख ८५ हजारांचा अपहार झाला. एप्रिल अखेरपर्यंत ७ प्रकरणात २४ लाख २४ हजार रुपयांची वसुली झाली. तसेच ३६ प्रकरणात १ कोटी २३ लाख ६१ हजार रुपयांची वसुली प्रलंबित आहे. दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. दोन प्रकरणांमध्ये दोषींवर विभागाीय चौकशी प्रस्तावित आहे. एका प्रकरणात मालमत्तेवर बोजा चढवला आहे. अद्याप ३१ अपहार प्रकरणात कार्यवाही झालेली नाही.

जवाहर योजनेत ३२ प्रकरणांत कारवाई नाही
जवाहर रोजगार योजना आता बंद झाली आहे. पण या योजनेंतर्गत धुळे तालुक्यात अपहाराची ४० प्रकरणांमध्ये वसुली आणि कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यात ४० प्रकरणांत ५० लाख ४८ हजार रुपयांचा अपहार सिद्ध झाला आहे. एप्रिल अखेर त्यापैकी ८ प्रकरणांमध्ये ८ लाख ५१ हजार रुपये वसूल झाले आहे. तसेच ३२ प्रकरणांमध्ये ४२ लाख ३३ हजार रुपयांची वसुली प्रलंबित आहे.

बातम्या आणखी आहेत...