आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या मतदानासाठी रांगा:ग्रा.पं. निवडणुकीत तरुणाईच्या मतदानासाठी रांगा;  जिल्ह्यातील ५२ ग्रा.पं.साठी  झाले ८२ टक्के मतदान

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सध्या कृषी हंगामाचे दिवस असल्याने सकाळच्या सत्रात मतदारांचा मतदानासाठी ओघ अधिक राहिला. दिवसभरात ८२ टक्के मतदान झाले. शुक्रवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

साक्री तालुक्यातील ४९ ग्रामपंचायती तर धुळे तालुक्यात देवभाने, शिंदखेडा तालुक्यातील चांदगड ग्रामपंचायतीचे सर्व वाॅर्ड तर धुळे तालुक्यातील मळाणे ग्रामपंचायतीच्या एका प्रभागाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक झाल्या आहेत.यामुळे ३८ धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायसाठी मतदान झाले.किरकोळ प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. सध्या शेतीच्या हंगामाचे दिवस सुरू आहेत.यामुळे मतदारांनी सकाळीच मतदानाला प्राधान्य दिले.मतदान करून मतदार शेताकडे रवाना झाले.यामुळे सकाळी ९.३० वाजेपर्यंत १८.३० टक्के मतदान झाले.तर ११.३० वाजेपर्यंत ४१.८० टक्के तर १.३० वाजे पर्यंत ५८.७० टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७२.३० टक्के मतदान झाले. तर सायंकाळी निर्धारित वेळे पर्यंत ८२ टक्के मतदानाची नोंद झाली.त्यात साक्री तालुक्यात ८१.८० टक्के, धुळे तालुक्यात ८६.४९ टक्के तर शिंदखेडा तालुक्यात ७५.४९ टक्के मतदान झाले.

आज मतमोजणी
मतदान झालेल्या ग्रा.पं.ची शुक्रवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एकच ग्रामपंचायत मतमोजणी असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल समोर येतील.तर साक्री तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...