आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन नियाेजनासाठी घेण्यात आली बैठक:अहिराणी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी; दर्शनासह अहिराणी नाट्यप्रयाेग हाेणार

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश साहित्य संघातर्फे सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रकट मुलाखत, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, गझल मुशायरा, खान्देशी लाेकधारा, सांस्कृतिक कार्यक्रमासह अहिराणी नाट्यप्रयाेग सादर हाेतील, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डाॅ. सदाशिव सूर्यवंशी यांनी दिली. संमेलनाची तारीख व संमेलनाध्यक्ष निवडीसाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

संमेलनाच्या नियाेजनासाठी प्राचार्या रत्ना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. याप्रसंगी संमेलनाच्या नियाेजनाबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक जिल्हाध्यक्ष देवदत्त बाेरसे यांनी संमेलनातून बागलाणी लहेजातून अहिराणीचे वेगळेपण जगासमाेर येण्यास मदत हाेईल, असे सांगितले. मालेगाव अध्यक्ष विवेक पाटील, युवा अध्यक्ष गणेश पाटील, प्रा.रमेश राठाेड, धुळे तालुकाध्यक्ष श्रावण वाणी, जळगाव प्रतिनिधी सुनीता पाटील यांनीही मनाेगत व्यक्त करीत संमेलनाच्या आयाेजनाबाबत भूमिका मांडली. संघाचे सचिव रमेश बाेरसे यांनी संमेलनाबाबत भूमिका मांडली. तर प्रभाकर शेळके यांनी पहिल्या संमेलनापासूनची माहिती दिली.

नवापूरचे अशाेक शिंदे, चाळीसगावचे मधुकर पवार, राजू हाके, जितेंद्र आहिरे, अनिल बैसाणे, सचिन बागूल यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक रमेश बाेरसे यांनी केले. तर आभार देवदत्त बाेरसे यांनी मानले. याप्रसंगी रमेश बोरसे, प्राचार्या रत्नमाला पाटील, प्रा.रमेश राठोड, प्राचार्य अशोक शिंदे, प्रभाकर शेळके (फागणे), अमळनेर तालुकाध्यक्षा सुनीता पाटील, रत्नाकर पाटील, मालेगाव तालुकाध्यक्ष विवेक पाटील, देवळा तालुकाध्यक्ष आबा आहेर, नाशिक जिल्हाध्यक्ष देवदत्त बोरसे, संजय धनगव्हाळ, गोकुळ पाटील, मधुकर मानसिंग पवार (चाळीसगाव), धुळे तालुकाध्यक्ष श्रावण वाणी, सचिन बागुल, जितेंद्र आहिरे, राजू हाके, अतुल बैसाणे यांच्यासह विविध साहित्यिक मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

अहिराणीच्या प्रचार, प्रसारासाठी मदत करावी
सर्व साहित्यिक तथा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी अहिराणीच्या प्रचार, प्रसार, संवर्धनासाठी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्यासह मदत करावी.
रत्ना पाटील, प्राचार्या

बातम्या आणखी आहेत...