आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्ताने शिबिरात महिलांचे रक्तदान करून अभिवादन

निजामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैताणे (ता.साक्री) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, प्रा.यशवंत गोसावी यांचे व्याख्यान, शोभायात्रा, प्रतिमापूजन आदी कार्यक्रमाने उत्साहात झाली.

२९ मे रोजी प्रा. यशवंत गोसावी यांनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचा कार्याचा गौरव सांगताना इतिहासातील अनेक दाखले देत प्रेरणादायी विचार मांडले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई लोकर विणकाम सोसायटीच्या प्रांगणात आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे जैताणेच्या सरपंच कविता अशोक मुजगे व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन करुन उद्घाटन करण्यात आले. जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात जैताणेच्या सरपंच कविता अशोक मुजगे, निजामपूर ग्रामपालिकेच्या सदस्य पुष्पांजली बच्छाव व ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. डॉ.रोहन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात १२१ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सायंकाळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची शोभयात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत तेजस्विनी रामचंद्र भलकारे या विद्यार्थिनीने अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारत घोड्यावर बसून शोभायात्रेत सहभाग घेतला.

जैताणेच्या उपसरपंच कविता शेवाळे, निजामपूरच्या सरपंच नीलिमा भार्गव, गटनेते मिलिंद भार्गव, निजामपूर ग्रामपंचायत सदस्य पुष्पांजली बच्छाव, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, जैताणे ग्रामपालिकेचे गटनेते बाजीराव पगारे, पत्रकार रघुवीर खारकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील, राकेश शेवाळे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, निजामपूर ग्रामपंचायत सदस्य ताहीर बेग मिर्झा, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव, धनगर समाज जैताणेचे अध्यक्ष पोपट न्याहळदे, जैताणे ग्रामपंचायत सदस्य गणेश न्याहळदे, शाम भलकारे, अहिल्यादेवी सोसायटीचे चेअरमन नारायण भलकारे, व्हा. चेअरमन मगन बागुल, भगवान भलकारे, प्राथमिक शिक्षक पावबा बच्छाव, दुसाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आकडे, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे डॉ. रोहन कुलकर्णी, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण खरे, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय न्याहळदे यांनी केले. आभार राकेश पगारे यांनी मानले. उत्सव समितीचे भूषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पगारे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...