आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:क्रांतीज्योती सावित्रीबाई‎ फुले यांना अभिवादन‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ‎जयंतीनिमित्त जिल्ह्यासह शहरात ‎विविध कार्यक्रम झाले. त्यात ‎प्रतिमापूजन, विद्यार्थ्यांची भाषणे,‎ गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप आदी ‎कार्यक्रमांचा समावेश होता.‎ शहरातील मातृसेवा संघाची ‎प्राथमिक शाळा व बालमंदिरात ‎ ‎ क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांना ‎ ‎ अभिवादन करण्यात आले.

या वेळी ‎पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना‎ स्वेटर वाटप करण्यात आले.‎ संस्थेचे चेअरमन प्रदीप शाह, रोटरी‎ क्लबचे अध्यक्ष राहुल अग्रवाल,‎ डाॅ.गिंदोडीया आदी उपस्थित होते.‎ धुळे तालुक्यातील गोताणे येथील‎ राजीव गांधी माध्यमिक व उच्च‎‎ माध्यमिक विद्यालयात बालीका दिन‎ साजरा करण्यात आला. प्राचार्य‎ एस. व्ही. देसले अध्यक्षस्थानी होते.‎ या वेळी पर्यवेक्षक डी. ए. पाटील,‎ एस. व्ही. देसले आदींसह मान्यवर‎ या वेळी उपस्थित होते.‎

महिला महाविद्यालय‎ शहरातील महिला महाविद्यालयात‎ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या‎ कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. डी.‎ झेड. चौधरी, प्रा. दिनेश खंडारे, प्रा.‎ डॉ. विनोद उपर्वट उपस्थित होते.‎ प्राचार्य डॉ. डी. झेड. चौधरी म्हणाले‎ की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले‎ यांनी शिक्षणाचा आग्रह धरला.‎ त्यामुळेच आता मुलींना शिक्षण‎ मिळत असल्याचे ते म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...