आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन; पराक्रमाला दिला उजाळा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेवाड नरेश, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यासह शहरात सोमवारी विविध कार्यक्रम झाले. शहरातील स्वस्तिक चाैकातील महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस अजितसिंह राजपूत, संदीप जडे, संताेष मिस्त्री, नीलेश गुरव, याेगेश वाणी, संध्या पाटील, स्वाती जाधव, निशा पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे अभिवादन
शिवसेनेतर्फे महानगरप्रमुख मनोज मोरे, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी, संजय वाल्हे, समन्वयक भरत मोरे, संदीप चव्हाण, रवींद्र माळी, संदीप चौधरी, मच्छिंद्र निकम, समाधान शेलार, कैलास मराठे, सचिन बडगुजर, आबा हराळ, संदीप चौधरी आदींनी अभिवादन केले.

आमदार कुणाल पाटील यांचे अभिवादन
आमदार कुणाल पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, जसपालसिंग सिसोदिया, नीलेश जाधव, पुतळा समितीचे अध्यक्ष अजित राजपूत, सागर पाटील, गोकुळ राजपूत, तेजपाल राजपूत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...