आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:भूजलपातळी वाढवावी; 76 हजार मालमत्ताधारक, जलपुनर्भरणानंतर कर सवलत घेणारे 61

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्रास बुधवार (दि.८) पासून प्रारंभ होत आहे. या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची संधी धुळेकरांना आहे. त्यासाठी जलपुनर्भरण करावे लागेल. शहरात सुमारे ७६ हजार मालमत्ताधारक आहेत, मात्र फक्त ६१ जणांनी जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करून मालमत्ता करात दोन टक्के सवलत घेण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यातून पाणी बचतीविषयी नागरिकांमध्ये असलेली अनास्था दिसून येते. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या घराच्या छतावर पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण अडवू शकतो.

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पुढे या
पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. धुळेकरांना पाण्यासाठी किमान ५ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागते. वारंवार मागणी करूनही महापालिका दररोज पाणीपुरवठा करू शकलेली नाही. भविष्यातील हे जलसंकट टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावणे आवश्यक आहे. तसे झाले तर फायदा होईल.

गेल्या वर्षी १९ मालमत्ताधारकांचे अर्ज
रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे छतावर पडणारे पावसाच्या पाइपाने जमिनीपर्यंत आणून ते शास्त्रशुद्ध पद्धतीने शोषखड्डा करून जमिनीत मुरवण्यात येते. त्यानुसार सन २०२१-२२ मध्ये १९ जणांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून महापालिकेत मालमत्ता करात सवलत मिळावी यासाठी अर्ज केले आहे.

मालमत्ता करात मिळते मनपातर्फे दोन टक्के सूट
महापालिकेकडे ४ वर्षांत रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या केवळ ६१ जणांनी मालमत्ताकरात सवलत मिळावी यासाठी अर्ज केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मालमत्ता करात दोन टक्के सवलत मिळते.

ऑपमध्ये नाही माहिती
पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्यास महापालिकेतर्फे मालमत्ताधारकांना मालमत्ता करात सवलत देण्यात येते. याविषयीची माहिती मालमत्ता कराच्या पावतीवर दिली अाहे. मात्र, अनेक नागरिक ऑनलाइन कर जमा करतात. पण ऑपमध्ये ही माहिती नाही.

फक्त ८ ते १० हजार खर्च
शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगविषयी नागरिकांमध्ये फारशी जनजागृती झालेली नाही. एका घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी फक्त ८ ते १० हजार रुपये मोजावे लागतात, अशी माहिती अभियंता अनुराग चांडक यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...