आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलाढालीचा पाडवा:वाहन व सोने बाजारात 30 कोटींची गुढी; दीड हजार किलो श्रीखंड फस्त

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन 100 दुचाकी, 300 चारचाकी रस्त्यावर

कोरोनामुळे बाजारपेठेत असलेले मंदीचे मळभ आता दूर झाले आहे. त्याचा प्रत्यय गुढीपाडव्याला आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नागरिकांनी विविध वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. त्यातही वाहन व सराफ बाजारात चैतन्य होते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात सुमारे ३० कोटींची उलाढाल झाली. नव्या १०० चारचाकी, ३०० दुचाकी रस्त्यावर उतरल्या. गुढीपाडव्याला बाजारात चैतन्याचे वातावरण होते. नागरिकांनी नवीन वस्तू खरेदीस प्राधान्य दिले होते. अनेकांनी दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी केली. काहींनी वाहनांची आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. अनेकांनी रोखीने वाहन खरेदीस प्राधान्य दिले होते. दुचाकीच्या किमतीत १ एप्रिलपासून दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानंतरही वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सराफ बाजारात दिवसभरात ४ कोटींची उलाढाल झाली. दागिन्यांपेक्षा सोन्याची वेढणी खरेदीस अनेकांनी पसंती दिली.

१०० चारचाकींची विक्री
चारचाकी वाहनांना मागणी जास्त अन् पुरवठा कमी अशी स्थिती होती. त दिवसभरात १०० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांच्या विक्रीतून २० ते २२ कोटींची उलाढाल झाली. तसेच ३०० दुचाकी विक्रीतून सुमारे ३ कोटींची उलाढाल झाली.

श्रीखंड प्रचंड मागणी
गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारल्यावर श्रीखंड, पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून श्रीखंडाला मागणी वाढली होती. सुमारे दीड हजार किलो श्रीखंडाची दिवसभरात शहरात विक्रीस झाल्याची माहिती देण्यात आली. उलाढाल वाढल्याने अर्थचक्र गतिमान झाले.

बातम्या आणखी आहेत...