आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:शेळीपालनावर शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासीबहुल भागातील शेतकरी, ‎ ‎ पशुपालक, युवकांसाठी कौशल्य ‎ ‎ विकास आधारित शेळीपालन ‎ ‎ याविषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण ‎ ‎ शिबिर घेण्यात आले. शिबिरात‎ विविध विषयांवर मार्गदर्शन‎ करण्यात आले.‎ महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे‎ कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील‎ आत्मा कार्यालयातर्फे शिबिर झाले.‎ कृषी महाविद्यालयाचे सहयोगी‎ अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर‎ अध्यक्षस्थानी होते.

या वेळी कृषी‎ विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक‎ प्रा. डॉ. दिनेश नांद्रे, प्रा. श्रीधर‎ देसले, शास्त्रज्ञ रोहित कडू, कृषी‎ विभागाचे रवींद्र बच्छाव, डॉ.‎ धनराज चौधरी उपस्थित होते. डॉ.‎ चिंतामणी देवकर यांनी पशु‎ संगोपनातून शाश्वत उत्पन्न कसे‎ घेता येऊ शकते विषयी माहिती‎ दिली. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न‎ दुप्पट करण्यासाठी महात्मा फुले‎ कृषी विद्यापीठातर्फे राबवण्यात येत‎ असलेल्या उपक्रमांची माहिती‎ देण्यात आली.

डॉ. धनराज चौधरी,‎ डॉ. योगेश महाले, डॉ. संदीप पोळ‎ यांनी शेळीपालन व्यवसायाची‎ ओळख, शेळीपालनाचे फायदे,‎ भारत व महाराष्ट्रातील शेळ्यांच्या‎ जाती, शेळीपालनाची पद्धत, आहार‎ व्यवस्थापन, पशू पैदास धोरण,‎ शेळ्यांचे लसीकरण व रोग‎ व्यवस्थापन, दूध व मांस खरेदी‎ विक्री व्यवस्थापन, विविध‎ शासकीय योजनांची माहिती,‎ प्रकल्प अहवाल तयार करणे आदी‎ विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य‎ डॉ. राहुल देसले यांनी अर्थव्यवस्थेत‎ पशुधनाचे महत्त्व व शेळी पालन‎ याविषयी मार्गदर्शन केले.

शिबिरात‎ सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र‎ वाटप झाले. रोहित कडू व डॉ.‎ अतिश पाटील यांनी आभार मानले.‎ चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ.‎ पंकज पाटील, जगदीश काथेपुरी,‎ अमृता राऊत, जयराम गावित, प्राची‎ काळे, स्वप्नील महाजन, बाळू‎ वाघ, कुमार भोये, रमेश शिंदे,‎ मधुसूदन अहिरे यांनी प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...