आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:वित्त साहाय्यासह प्रकल्प अहवालावर मार्गदर्शन; देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला कार्यक्रम

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभाग, सॅटर्डे क्लब, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इनोव्हेटिव्ह इनक्युबेशन लिंकेजेसतर्फे भावी अभियंते व नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रकल्प अहवाल तयार करणे, वित्त साहाय्य आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

केसीसीआयएलचे सदस्य प्रा.भूषण चौधरी, डॉ. विकास गीते, प्रा. सिंग व प्रा.निखिल कुलकर्णी उपस्थित होते. एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्रसिंग राठोड, सॅटर्डे क्लबचे रिजनल हेड व उद्योजक नितीन पाटील, सीए श्रीराम देशपांडे, सीए राजाराम कुलकर्णी, अक्षय सावजी, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उद्योजक संजय देसले आदी उपस्थित होते. डॉ. जितेश पाठक यांनी प्रास्ताविक केले. अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवरे व प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...