आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा पे चर्चा:मार्गदर्शनामुळे परीक्षेचे दडपण कमी, पंतप्रधानांचा कार्यक्रम नवोदय विद्यालयामध्ये प्रक्षेपित

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांना काही दिवसांत प्रारंभ होणार आहे. या परीक्षेचे दडपण कमी व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांशी परीक्षा पर चर्चा कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. शहरातील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रक्षेपण बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्याने परीक्षेचे दडपण कमी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोना संकटामुळे दोन वर्षे शाळा बंद होती. यंदाही पहिले सत्र ऑनलाइन झाले. त्यानंतर दुसरे सत्र ऑफलाइन होते आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती आहे. ही भीती दूर व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा या उद्देशाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जवाहर नवोदय विद्यार्थ्यांच्या प्राचार्या उषा माने यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्राचार्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालयात परीक्षा पर चर्चा कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले. एकाच वेळेस शाळेतील ५०० विद्यार्थी आणि १५० पेक्षा अधिक शिक्षकांनी कार्यक्रम बघितला. पी.डी. विल्यम, कार्यालय अधीक्षक गोकुळ धनगर, एस.एस. पाटील, जी. आर. दौड, व्ही.सी. भालेराव, डी. एस. पाटील, कामील अन्सारी, राजू भुईकर यांनी संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...