आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:मोलगी येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

धडगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कै. प्रा.बी.सैंदाणे कनिष्ठ महाविद्यालय मोलगी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रजनी सोनार होत्या. प्रा.रवींद्र वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

तसेच १२ वी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थी लख्खन पाडवी, इला राऊत, किसन वसावे रागिणी ढोले, पद्मावती वसावे या विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापनाचे कार्य केले. प्राचार्य प्रवीण चौधरी, प्रा. एम. आर. चौरे, प्रा.डी के वसावे, गणेश वसावे, मनोहर नुक्ते उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.व्ही. डी. कुवर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी इला राऊत यांनी केले. आभार प्रा.धीरेंद्र पाटील यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...