आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एसव्हीकेएम संस्था संचलित एनएमआयएमएस स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे ऑनलाइन कॉर्पोरेट लीप कार्यक्रम झाला. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह व्यवसायावर मार्गदर्शन करण्यात आले. लहान शहरातील नागरिकांना नवनवीन अभ्यासक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत झाला. कार्यक्रमात मुंबई येथील वेस्टर्न इंडियन रिजनल कौन्सिल ऑफ आयसीएआय (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया) या संस्थेतील मान्यवरांचे एकूण ३६ तासाचे व्याख्यान प्रत्येक शनिवारी व रविवारी झाले.
या कार्यक्रमात इंदूर, नाशिक, औरंगाबाद, धुळे परिसरातील ४७ जणांनी सहभाग नोंदवला. मुंबई येथील सीए अजय दवे यांनी एक्सेल, सीए अमित वैशंपायन यांनी टॅली, सीए भावीन पारेख यांनी जीएसटी, सीए दर्शन ठक्कर यांनी ई फाईलींग, सीए विष्णू गावकरी यांनी टीडीएस व स्कूल ऑफ कॉमर्सचे प्रभारी असोसिएट डीन सीए कुणाल पसारी यांनी लीडरशिप व बिझिनेस कम्युनिकेशन याविषयावर मार्गदर्शन केले. या उपक्रमात सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन स्कूल ऑफ कॉमर्सचे प्रभारी असोसिएट डीन सीए कुणाल पसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. आस्था शर्मा, प्रा. राजेंद्र अग्रवाल, सीए पूजा सदाने, प्रा. अनघा तायडे, प्रा. नेहा तनेजा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासकीय अधिकारी नितीन चव्हाण, दिनेश देशमुख, पायल जैन, नीलेश पारकर, नंदकिशोर गोसावी यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.