आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेविषयक शिबिर:तळोदा येथे कायदेविषयक शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुका वकील संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्या माध्यमातून गो. हू. महाजन व शी.ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक शिबिर झाले. प्रमुख वक्ते म्हणून दिवाणी न्यायाधीश एस. जी. पांडे यांनी मार्गदर्शन केले.या वेळी विधिज्ञ किरण बैसाणे, प्राचार्य अजित टवाळे, उपमुख्याध्यापक अमरदीप महाजन, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य शीतल महाजन, पर्यवेक्षक बी. जी. माळी, ए.एल. महाजन उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थ्यांना वाहन सुरक्षा कायदा सोबतच शाळा व महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या रॅगिंग प्रकाराबाबत विविध कायद्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. याबाबत कायदेविषयी माहिती रॅगिंग या विषयावर विधिज्ञ डी.व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विधिज्ञ राहुल मगरे यांनी वाहनासंदर्भात रस्ता सुरक्षा कायदा बाबत अल्पवयीन वाहन चालक तसेच परवाना काढणे का आवश्यक आहे. परवाना नसल्यास त्याचे परिणाम काय, याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...