आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मालेगावकडे जाणारा गुटखा हस्तगत

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या दोन खासगी ट्रॅव्हल्समधून गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ६ जणांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या हंस कंपनीच्या लक्झरीतून एनएल-०७-बी-०५४१ व एनएल-०७-बी-०५४५ गुटख्याची वाहतूक केली जात होती. ही लक्झरी एलसीबी पथकाने मंगळवारी पहाटे अवधान शिवारात अडवल्या. याबाबत चालक व सहचालक मोहंमद रईस गुलजार अहमद (वय ३६, रा. यशवंत मार्ग, घोडा पछाड मंदिराजवळ, उज्जैन), शेख रमजान शेख शुबरानी (वय ४५, रा. खाश्वली वॉर्ड, गुलशननगर, खंडवा), रघुराज दुर्गा मीना (वय २९, रा. देवास), मोहंमद अशरफी अब्दुल अजिज (वय ३४, रा. चंदननगर, आमकारोड, इंदूर), राजेश गणेश सिसोदिया (वय ४५, इंदूर), हरिशंकर जल्लू यादव (वय २२, रा. बिरसिंगपूर, जि. सतना) यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे दोन्ही लक्झरी पोलिस मुख्यालयात आणून त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी लक्झरीत गुटखा आढळला. जप्त गुटखा व वाहनाची एकत्रित किंमत पोलिसांनी ७६ लाख २८ हजार २० रुपये आकारली आहे. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी संजय पाटील, संदीप सरग, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.