आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एच. आर. पटेल कन्या विद्यालय; पटेल संस्थेच्या सर्वच 21 शाळांनी निकालात ओलांडली शंभरी

शिरपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेत येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संस्थेच्या सर्व २१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. एच. आर. पटेल कन्या विद्यालयातील स्नेहा भावसारला ९७.२० टक्के गुण मिळाले. ती तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय आली.संस्थेतील १ हजार ७८५ विद्यार्थ्यांपैकी सर्व १ हजार ७८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

संस्थेतील ९२६ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे १ हजार ७६८ म्हणजे ९९.०५ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिरपूर शहरातील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहा रवींद्र भावसारने ९७.२० टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच विज्ञान विषयात निलाक्षी जगदीश गिरासेने १०० पैकी १०० व हिताक्षी योगेशकुमार पाटीलने १०० गुण प्राप्त करुन यश संपादन केले. विद्यार्थ्यांना आमदार अमरिश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उद्योगपती चिंतन पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच. आर. पटेल विद्यालय
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. स्नेहा रवींद्र भावसार ९७.२० टक्के, निलाक्षी गिरासे ९७, उर्वशी बारी ९६.८०, प्रज्ञा गिरासे ९६.६०, हेमांगी जमादार ९६.६०, चैताली पाटील ९६.६०, हिताक्षी गिरासे ९६.४०, चेतना बेहेरे ९६.४०, चैतन्या निकम ९६.४० टक्के गुण मिळवत यश मिळवले. सर्वांना प्राचार्य आर. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल इंग्लिश स्कूल
शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. स्वामी सोनगडे ९६ टक्के, जयेश पाटील ९५.८०, खुशवंत पाटील ९५.६०, प्रांजल दोरीक ९४.४०, तेजस धनगर ९५.४०, चारुलता माळी ९५.४०, वेदांती पाटील ९५.४०, तनिषा पाटील ९५.४०, प्रांजल कुमावत ९५.२०, यश भदाणे ९५.२० टक्के गुण मिळवून यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल परब यांचे मार्गदर्शन लाभले.

मुकेशभाई पटेल मिलिटरी
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. विनीत चौधरीने ९३.८० टक्के, हर्षलभाई साळुंखे ९३.६०, सार्थक पटेल ९३.४०, संकेत गिरासे ९२.८०, काजल राजपुरोहित ९२.४०, हेमकांत धनगर ९२.४०, अनुज पवार ९२.४० टक्के गुण मिळवले. विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विद्यालय खर्दे
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. पवन मराठेने ९१.२० टक्के, उन्नती खोंडे ९०.८०, स्मिता चौधरी ९०.२०, पुजा पवार ९०, दिपाली कोळी ८९.८०, गायत्री गुजर ८९.८० टक्के गुण मिळवून यश मिळवले. विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. आर. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल शाळा भोरखेडा
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शितल वानखेडेने ९४ टक्के, वैजवी पवार ९३.६०, अर्पिता चौधरी ९३.२०, स्नेहल पाटील ९२.४०, जानवी पाटील ९२.२० टक्के गुण मिळवले. सर्वांना प्राचार्य आर. एफ. शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल शाळा टेकवाडे
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. दामिनी गिरासे ९५ टक्के, जान्हवी पाटील ९४.८० , माधवी मोरे ९४.८०, यश राजपूत ९४.६०, अश्विनी धनगर ९४.६०, राज शिरसाठ ९४.६०, कल्याणी ढोले ९४.४९, दिव्या शिरसाठ ९४.२० टक्के गुण मिळवून यश मिळवले. विद्यार्थ्यांना प्राचार्य के. आर. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच. आर. पटेल विद्यालय वरूळ
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथा गिरासे ९२ टक्के, कल्याणी कोळी ९२, तनुजा पाटील ९२, पुजा परदेशी ९१.८०, ममता पाटील ९१.२०, प्रिती पाटील ९१.२०, देवयानी तिरमले ९१.२०, यशोदा पाटील ९१, मयुरी पाटील ९०.८० टक्के गुण मिळवून यश मिळवले.

आर. सी. पटेल शाळा खंबाळे
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेत मानसी हिवाळे ९३.२० टक्के, आरती पावरा ९३, सिमरन पावरा ९२.४०, सुप्रिया पावरा ९१.८०, आरती पावरा ९१.६० टक्के गुण मिळवून यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...