आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस सेवा सुरू:तळोदा, बोरद,मालदा मार्गावरील बस पुन्हा सुरू झाल्याने आनंद; तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा दि. 9 मेपासून सुरू झाली

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक व चालकांचा संपामुळे बंद असलेली तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा दि. ९ मेपासून सुरू झाली आहे. तळोदा, बोरद, मालदा या मार्गावर बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागात आनंद व्यक्त करण्यात आला.

तळोदा तालुक्यात बोरद, तळोदा, अमोनी तसेच राणीपूर असे महत्त्वाचे मार्ग आहेत. एकट्या बोरद मार्गाने परिसरातील लहान मोठी ४० गावे जोडली जातात. मात्र बससेवा सुरू होत नसल्याने नागरिकांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. खासगी वाहनांनी अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या त्रासातून जात होती.

मात्र संप मिटल्यामुळे बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे सुरुवातीला बोरद मार्गावरील बस सुरू झाली आहे तर अमोनी व राणीपूर मार्गावर देखील बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...