आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा स्थापन:गणिताची भीती घालवण्यासाठी हस्ती मंडळातर्फे गणितरुपी बाप्पा स्थापन

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील दाेंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये हस्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. यंदा मंडळाने गणितरूपी गणरायाची स्थापना केली आहे.

शाळेत शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यावर माझ्या कलेतून, माझा बाप्पा ही कार्यशाळा घेण्यात आली. कला शिक्षक मनोहर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर व मनोहारी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. भूमिका पूजा हरिकृष्ण निगमने साकारलेल्या मूर्तीची स्थापना हस्ती मंडळाने केली आहे. अवघड वाटणारा गणित विषय सोपा व सुलभ व्हावा, यासाठी सन २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गणित वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर हस्ती स्कूल परिवारातर्फे वर्षभर गणित विषयावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतात आहे.

गणेशोत्सवातही गणितावर आधारित साजरा होतो आहे. गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे चित्र माउंट बोर्डवर रेखाटून त्याला गणितीय चिन्हांनी सजवले आहे. सोबतच हस्ती सांस्कृतिक मंडळाने गणितीमय देखावा साकारला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी गणित विभाग प्रमुख रितेष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषय शिक्षकांनी गणित अध्यापन शैक्षणिक साधने तयार केली. यात त्रिकोणमिती घड्याळ, वर्गमूळ घड्याळ, रेडियन घड्याळ, एकत्रित गणित सूत्र घड्याळ, लसावी व मसावी-वर्किंग मॉडेल, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, टाइप्स् ऑफ अँगल, टू-डी व थ्री-डी भौमितिक आकार, एकरूप त्रिकोण मॉडेल आदींचा समावेश आहे. सर्व साहित्याची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भक्ती व भावगीत गायन स्पर्धा, भक्ती गीतांवर आधारित एकल नृत्य स्पर्धा, हिंदी प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. गणेशोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य हरिकृष्ण निगम यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर यादव, माधुरी गोसावी, प्रवीण गुरव, भूषण दीक्षित, संजय मोरे, महेश इंद्रेकर, मनोज ठाकुर, मयूरी दीक्षित, विशाल पवार आदी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...