आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील दाेंडाईचा येथील हस्ती काे-ऑप.बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. बँकेचे अध्यक्ष कैलास जैन अध्यक्षस्थानी होते. काेरमअभावी अर्धातास सभा तहकूब होती. बँकेचा गेल्या नऊ वर्षांपासून नेट एनपीए शून्य टक्के आहे. तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकेला १७ काेटी ११ लाखाचा निव्वळ नफा झाला. ठेवी, कर्ज येणे आदीचा एकत्रित व्यवहार १ हजार ४८० काेटीपर्यंत आहे.
स्थापनेपासूनच बँकेला अ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. उपाध्यक्ष डॉ. दिलीपकुमार चोरडिया, संचालक पहलाज माखिजा, राजेंद्रकुमार चोपडा, संजय दुग्गड, प्रा. जितेंद्र पाटील, पांडुरंग कागणे आदी उपस्थित होते. सभेत बँकेचा अहवाल, ताळेबंद, नफा व तोटा पत्रक व बँकेचे ऑडिट रिपोर्टला मंजुरी दिली. बँकेचे ग्रॉस एनपीए प्रमाण २.४८ टक्के व नेट एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. बँकेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २५ टक्के डिव्हिडंट सभासदांना दिला होता. सन २०२१-२२ या वर्षासाठी १५ टक्के लाभांश मंजूर झाला आहे. माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, कैलास जैन यांनी मनोगत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.