आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:घरगुती गॅसचा वाहनात धोकेदायक पद्धतीने वापर

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पारोळा रोडवरील एका हॉटेल मागे धोकेदायकरीत्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरला जात होता. या ठिकाणी मंगळवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चार जणांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पारोळा रोडवरील हॉटेल मागे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका होईल, अशा पद्धतीने वाहनांमध्ये गॅस भरला जात होता.

या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून वाहनात गॅस भरणारा फिरोज अकिल पिंजारी (रा. देवपूर) व गॅस भरण्यासाठी आलेले फारुख मुश्ताक खाटीक, आदिल शेख कमरोद्दीन, किरण शिवाजी शेंडगे यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत कार, ऑटोरिक्षा, स्कूटी, ६ गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक माेटार, नोझल, ५ मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी चौघांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी कबीर शेख, मंगा शेमले, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, जितेंद्र आखाडे, शेखर चंद्रात्रे, भागवत पाटील, सुनील कुलकर्णी, प्रशांत पाटील, धोंडीराम गु्ट्टे यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...