आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळला:बुटाच्या लेसने हातपाय बांधून चोपड्याच्या स्वप्निलला फेकले

धुळे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे बॅरेजजवळ स्वप्निल पाटील या तरुणाचा मृतदेह आढळला होता. अज्ञात मारेकऱ्याने चोपडा तालुक्यातील अनवर्दे येथील स्वप्निलचे हातपाय बुटाच्या लेसने बांधून त्याला तापी पात्रात फेकल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यावरून अज्ञात मारेकऱ्यांवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुलवाडे येथील तापी नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चौकशीअंती हा मृतदेह स्वप्निल केशव पाटील (रा. अनवर्दे, ता. चोपडा, जि जळगाव) याचा असल्याचे समोर आले.

माहितीनुसार, मृत स्वप्निल कामानिमित्त गावाला आला होता. त्यानंतर घोडगाव येथील मित्रांना भेटण्यासाठी तो मोटारसायकलने (एमएच १९ डीसी ४११०) घराबाहेर पडला. अज्ञात मारेकऱ्याने स्वप्निलच्या बुटाची लेस काढून त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला तापीच्या पात्रात फेकून त्याचा खून केला.