आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:नवापुरात शिबिराद्वारे आरोग्य अन् नेत्र तपासणी ; मान्यवरांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शहरातील आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर येथे लायन्स ताराचंद बाप्पा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, सायन मुंबई तसेच दिव्य ज्योती ट्रस्ट, तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल, मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी रोजी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शेकडो नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्षा हेमलता पाटील तर उद्घाटक राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष उमेश पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप तालुकाध्यक्ष भरत गावित, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, जिल्हा भाजप सरचिटणीस राजेंद्र गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद पाटील, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरसेवक विशाल सांगळे, नगरसेविका अरुणा पाटील, मंगला सेन, बबिता वसावे, मीनल लोहार, सविता नगराळे, नगरसेवक विशाल सांगळे, अजय गावित, माजी नगरसेवक दर्शन पाटील, सुरेश पाटील, यशवंत पाटील, विनायक पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देण्यात आले. समाजाचे उपाध्यक्ष प्रा.उमेश पाटील यांचा मोफत ट्यूशनबद्दल सत्कार झाला. मान्यवरांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.

आरोग्य, नेत्र तपासणीसाठी यांनी केले सहकार्य आरोग्य शिबिरात मुंबई येथील लायन्स ताराचंद बाप्पा हॉस्पिटलचे प्रकल्प अधिकारी परेश आंबेरकर, शल्यचिकित्सक डॉ.शमीम शेख, परिचारिका नलिनी मोरे, आकाश थोरात, वृषाली, देविना, निकिता, कशिश आदींनी रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार केले. तसेच नेत्र तपासणीसाठी मांडवी येथील तेजस आय हॉस्पिटलचे डॉ.अल्पेश मिस्त्री, चिराग टेलर, धवल चौधरी, देवांशी वसावा आदींनी तपासणी करून रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...