आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी महासंघ:व्यापाऱ्यांच्या आरोग्यासाठी हेल्थ कार्ड याेजना राबवणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले रहावे, या उद्देशाने धुळे व्यापारी महासंघातर्फे व्यापाऱ्यांसाठी हेल्थकार्ड याेजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत एकाच वेळी ४० आरोग्य तपासण्या केल्या जातील. याेजनेला उद्या रविवारी (दि.१८) प्रारंभ होणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी दिली.

व्यापाऱ्यांना व्यवसायातील तणावामुळे आजारांना सामोरे जावे लागते. काही वेळा प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन धुळे व्यापारी महासंघातर्फे सर्व व्यापाऱ्यांसाठी शहरातील खासगी हॉस्पिटलच्या सहकार्याने हेल्थकार्ड योजना राबवली जाणार आहे. या याेजनेतंर्गत जवळपास ४० प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. तसेच आरोग्य विषयक समस्या असल्यास मार्गदर्शन केले जाईल. ही योजना १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पूर्व नोंदणीनंतर ही सेवा मिळेल. योजनेला उद्या रविवारी सकाळी दहा वाजता विघ्नहर्ता हाॅस्पिटल येथे प्रारंभ होणार आहे. अधिक माहितीसाठी व्यापारी महासंघाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...