आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य धोक्यात:मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य आले धोक्यात

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होतो आहे. त्यामुळे मोकळ्या जागांवर पाणी साचले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून आरोग्य धोक्यात आल्याने महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या मोकळ्या जागांसह खुल्या भूखंडावर पाणी साचले आहे. देवपूर परिसरातील वलवाडी, नकाणे रोडसह अन्य भागात पाण्याचा निचरा झालेला नसल्याने पाणी मोकळ्या जागेत साचले आहे. देवपुरातील दत्त काॅलनी परिसरातील मैदानात पूर्णपणे पाणी भरले आहे. या ठिकाणी झुडपे व गवत उगवले आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी, परिसरात फवारणी करावे, अशी मागणी होते आहे.

बातम्या आणखी आहेत...