आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा‎:अपंग युनिटच्या शिक्षकांची सुनावणी;‎ तीन शाळांचा युनिट नसल्याचा खुलासा‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपंग एकात्म शिक्षण योजनेत ‎ ‎ माध्यमिकस्तरावर कार्यरत‎ शिक्षकांची पडताळणी करण्याचे आदेश होते. त्यानुसार शिक्षण ‎सहसंचालक नितीन उपासनी यांच्या ‎ ‎ उपस्थितीत शहरातील विद्यानिकेतन ‎ ‎ येथे धुळे जिल्ह्यातील २९५ व‎ जळगाव जिल्ह्यातील १७५‎ शिक्षकांच्या पडताळणीची प्रक्रिया‎ सुरु झाली. त्यानुसार गुरूवारी ९४‎ जणांची सुनावणी पुर्ण झाली. या‎ वेळी तीन शाळांच्या‎ मुख्याध्यापकांनी अपंग युनिट सुरु‎ नसल्याचा खुलासा केला.‎ अपंग एकात्म शिक्षण योजनेत‎ माध्यमिकस्तरावरील शिक्षकांच्या‎ बोगस मान्यता, संशयास्पद‎ मान्यतेतील गैरप्रकाराबाबत आमदार‎ ना. गो. गाणोर यांनी तक्रार केली‎ होती.

त्यानंतर मान्यतांची चौकशी‎ झाली. हे प्रकरण न्यायालयात‎ गेल्यावर उच्च न्यायालयाने एकस्तर‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मान्यतांची‎ चाैकशी करण्याचे आदेश दिले.‎ त्यानुसार राज्यात अपंग एकात्म‎ शिक्षण योजना माध्यमिक‎ स्तरावरील शिक्षकांची पडताळणी‎ सुरु झाली. धुळे जिल्ह्यात २९५ तर‎ जळगाव जिल्ह्यात १७५ अपंग‎ युनिटच्या शिक्षकांच्या‎ पडताळणीसाठी शिक्षण विभागाचे‎ सहाय्यक संचालक नितीन उपासनी‎‎ यांची नियुक्ती झाली आहे.

त्यानुसार‎ गुरूवारी अधीक्षक,‎ विस्ताराधिकाऱ्यांच्या मदतीने‎ सुनावणी सुरू झाली. सुनावणीसाठी‎ पाच टेबल होते. या वेळी शिक्षकांची‎ मान्यता, वैयक्तीक मान्यता, स्पेशल‎ बीएड, अपंग युनिट असल्याची‎ खात्री करण्यात आली. दिवसभरात‎ ९४ शिक्षकांची सुनावणी झाली. या‎ वेळी तीन शाळेतील शिक्षकांनी‎ शाळेत अपंग युनिट नव्हते असा‎ खुलासा केला. तपासणी शुक्रवारीही‎ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...