आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाचा तडाखा वाढल्याने चक्करबर्डी परिसरातील हिरे रुग्णालय व साक्री रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू झाला आहे. कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी एकही रुग्ण दाखल नाही.
शहरातील हिरे रुग्णालयात मेल व फिमेल वॉर्डात प्रत्येकी २ असे एकूण ४ बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. बेड जवळ कुलर व इतर आवश्यक सुविधा केली आहे. तसेच साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयातही उष्माघात कक्ष सुरू झाला आहे. त्यासाठी अपघात विभागात दोन बेड राखीव आहे.
ग्रामीण रुग्णालयांना कक्ष करण्याची केली सूचना
ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करावा, अशी सूचना देणयात आली आहे. लवकरच या ठिकाणीही कक्ष सुरू होणार आहे. दोन दिवसांपूर्वी उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार कसे करावे याची माहिती देण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अशी घ्यावी काळजी
भरपूर पाणी, सरबत प्यावे.
सैल कपडे परिधान करावे.
उन्हात जाताना छत्री, रुमाल, टोपी, गॉगल वापरा.
पांढरे कपडे परिधान करा.
घर-कार्यालयात पडदे लावा. सनशेडचा वापर करा.
प्रवासात पाण्याची बाटली ठेवा.
लिंबू,टरबूज,शहाळ्याचा आधार घ्या.
त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा
उन्हाचा प्रकोप वाढतो आहे. त्यामुळे शक्य झाल्यास सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घराबाहेर पडू नये. जास्तीत जास्त पाणी प्यावे. उष्माघाताचा त्रास झाल्यास लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.