आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसार आले उघड्यावर:खरडबारीत मुसळधार, घर पडले, पत्रे उडाले; आपत्तीग्रस्तांना हलवले गावातील शाळेत

साक्री24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील खरडबारी गावात शनिवारी रात्री दहा वाजेनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरांवरील पत्रे शंभर ते दोनशे फूट अंतरापर्यंत उडाले. काही घरांची पडझड झाली. सहा ते सात नागरिक जखमी झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. नुकसानग्रस्तांना गावातील शाळेत स्थलांतरित केले आहे.

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टा परिसरातील खरडबारी गावात शनिवारी रात्री दहा वाजेनंतर अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गावात काही वेळ चक्रीवादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांवरील पत्रे उडाले. काही घरांवरील कौल खाली पडली. पक्क्या घरांच्या भिंतीही पडल्या. वादळ व पाऊस थांबवल्यावर जखमींना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले. गोठ्यात बांधलेले बैल, गाय व अन्य जनावरेही जखमी झाली आहे. कांद्याला सर्वाधिक फटका बसला. कांदा चाळीचेही नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी नुकसानीची रविवारी पाहणी केली.

आमदार गावितांचे मदत मिळवून देण्याचे आश्वासन
नुकसानीची आमदार मंजुळा गावित यांनी रविवारी पाहणी केली. या वेळी माजी खासदार बापू चौरे, डॉ. तुळशीराम गावित, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य खंडू कुवर, सरपंच ज्योती गवळी, पोलिस पाटील बानूबाई देशमुख, पेसा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, मनोज सूर्यवंशी उपस्थित होते. भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील, असे आश्वासन आमदार गावित यांनी दिले.

विजेच्या वाहिन्या तुटल्या
वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तसेच विद्युत पोल व विजेच्या वाहिन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...