आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:नवापूर तालुक्यात अतिवृष्टी , चितवीत घर कोसळून महिलेचा मृत्यू, विरचक ओसंडले

नंदुरबार/तळोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी नवापुरात सर्वाधिक पाऊस झाला. नंदुरबार त्या खालोखाल पावसाची नोंद झाली. शिवण नदीवरील विरचक धरण ओव्हरफ्लो झाल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या टंचाईपासून नंदुरबारकरांची वर्षभर मुक्तता झाली. सोमवारी पावसातच ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आठवडे बाजार भरला नाही.

तळोदा : लघुप्रकल्प फुल्ल
तळोदा तालुक्यातील लघुप्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले असून, कोठार रोझवा, नवागाव, रांझणी, आमलाड व तुळाजा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार गिरीश वखारे यांनी सांगितले की, रोझवा व सिंगसपूर लघुप्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले असून येणाऱ्या काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

नवापूर तालुक्यात ६८.८, तळोद्यात ३८.९
नवापूर तालुक्यात ६८. ८ मिमी, नंदुरबार ३५.९, शहादा १५ .६, तळोदा ३८.९, धडगाव ३३.४ व अक्कलकुवा ३३.१ मिमी पावसाची नोेंद झाली.

सतर्क राहा : नदीकाठावरील गावांना सूचना
संततधार पावसामुळे विरचक धरणात ९०.६१ टक्के साठा असून, शिवण नदीपात्रात ११८६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. विरचक पाटलीपाडा, खामगाव, बिलाडी, नारायणपूर, पापनेरपाडा, सुंदरदे, करणखेडा, बद्रीझिरा, राजापूर, भवाली, धुळवद, व्याहूर, नळबे बु., वेलदा, कविठे, नेवाली या नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

घर कोसळल्याने एक महिला जखमी
नवापूर तालुक्यात अतिवृष्टीने चितवी गावातील कागडीबाई धाऱ्या गावित (वय ८०) या महिलेच्या अंगावर घर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली. मंगळवारी दुपारी दीड दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तर सरला भरत गावित (वय ३८) जखमी झाल्या अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. कागडीबाईच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, दोन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...