आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच विद्याशाखांच्या प्रवेशाच्या चौकशीकडे विद्यार्थी आणि पालक वळले आहेत. दरम्यान दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविकेला प्राधान्य देण्यात येते. मागील वर्षा प्रमाणेच या वर्षी देखील तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीचा निकाल जाहिर होण्यापूर्वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. २ जून पासून ऑनलाईन नोंदणी सोबतच कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. या करीता प्रत्येक तंत्रनिकेतन महाविद्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या मदत केंद्राशी संपर्क साधत विद्यार्थी आणि पालकांना आपल्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. जिल्ह्यात तंत्रनिकेतनच्या २६३३ एवढ्या जागा आहेत.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांची एेन वेळेस प्रवेशासाठी धांदल उडू नये या उद्देशाने तंत्रशिक्षण संचालनालयाने मागील वर्षी दहावी निकालापूर्वीच पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली होती. यावर्षी देखील २ जूनपासून पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व दहा पॉलिटेक्निक महाविद्यालयात मदत केंद्रात विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासोबतच कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. या नोंदणीच्या आधारेच प्रवेशाची पुढील प्रक्रीया पार पडणार आहे.
२ ते ३० जून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे, प्रवेशासाठीचे आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे, याच कालावधीत कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी प्रोव्हीजनल मिरीट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर हरकत आणि तक्रारीसाठी ४ ते ६ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने हेल्पलाईन सुरु केली आहे. 8698781669, 8698742360 या क्रमांकावर सकाळी १० ते ६ पर्यंत विद्यार्थ्यांना संपर्क साधता येणार आहे.
प्रवेशाची प्रक्रिया सुरू
पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ऑनलाइन नोंदणीसह कागदपत्रांची पडताळणी मदत केंद्रात करण्यात येत आहे. अर्ज निश्चित करून घ्यावा. मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.प्राचार्य ए.बी. वाघ, निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
असे आहेत कॉलेजेस
जिल्ह्यात एक शासकीय आणि नऊ खासगी तंत्रनिकेतन महाविद्यालय आहेत. त्यात दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन, नेताजी पॉलेटेक्निक निकम पॉलेटेक्निक, आदर्श पॉलेटेक्निक, शिवाजीराव देवरे पॉलेटेक्निक, अंहिसा पॉलेटेक्निक, गंगामाई पॉलेटेक्निक, संजय पॉलेटेक्निक, आर.सी.पटेल पॉलेटेक्नि ,जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दहा पॉलिटेक्निक महाविद्यालयात २ हजार ६३३ जागा उपलब्ध आहेत.
या कागदपत्रांची आहे आवश्यकता
पॉलेटेक्निकच्या प्रवेशासाठी दहावी मार्कशीट, दहावी सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयत्व दाखला, डोमेसाईल, समागासवर्गीय प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,३१ मार्च २०२३ पर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमीलेयर आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.