आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकाल:हिमायू चव्हाण जीवशास्त्र विषयात चमकला; शहादा परिसरातील शाळांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

शहादा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बारावीचा निकाल उत्तम लागला असून, यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. कै.जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या निकाल ९९.४० टक्के लागला. विज्ञान शाखेत हिमायू सदाशिव चव्हाण ही विद्यार्थिनी ९१.१७ टक्के गुणांसह प्रथम, दिशा बधू पटेल ही ९०.५० टक्के गुणांनी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

कला शाखेचा निकाल ८७.२५ टक्के लागला असून विद्यालयात ईसानीअफीन बानो ७६.५० टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम, प्रियंका बापू अलकारी ही .३३ टक्के गुणांनी द्वितीय आली. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. डिंपल उमेश अग्रवाल ८८.१७ गुणांसह विद्यालयात प्रथम तर मेमन मिसबाह ८५.३३ गुणांनी द्वितीय आली. माहिती व तंत्रज्ञान शाखेत शरयू प्रकाश पाटीलने १०० पैकी १०० गुण मिळवले. तर हिमायू सदाशिव चव्हाणने जीवशास्त्र विषयात १०० गुण मिळवून राज्यात प्रथम आला. संस्थाध्यक्ष मोतीलाल पाटील व संचालक अभिजित पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

वसंतराव नाईक महाविद्यालय
वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागला असून यश राजेश राठोड ८९.५० टक्के गुणांसह ताे विद्यालयात प्रथम तर चेतन प्रवीण सोनवणे हा ८६.३३ टक्के गुणांनी द्वितीय आला. कला शाखेचा निकाल ८९.४३ टक्के लागला. निर्जल रामदास गुरव याने ८२ टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम तर कुणाल संजय भोई याने ७८ टक्के गुणांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

शारदा कन्या विद्यालय
शारदा कन्या विद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ९४.२० टक्के लागला. मिसबाह इक्बाल पिंजारी ८२.५० टक्के गुणांसह प्रथम, हीना कौसर मन्यार ही ८०.१७ टक्के गुणांनी द्वितीय आली. संस्थाध्यक्ष अॅड.सुधीर जाधव, प्रतिमा जाधव, सचिव प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव यांनी कौतुक केले. व्हॉलंटरी विद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के लागला. अपूर्वा हरीशकुमार ही (९१.१७) प्रथम, अंजली हरीशकुमार (८९.८३) द्वितीय आली.

मुक्ताई महाविद्यालयात दोन्ही शाखांचा १०० टक्के निकाल
येथील मुक्ताई कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान व कला या दोन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेत परी मनोज सोनी ८५.३३ टक्के गुणांसह प्रथम तर ओम दिलीप निकम ८३ टक्के गुणांनी द्वितीय आला. कला शाखेत ललिता राजेश वर्मा ७४.३६ टक्के गुणांसह प्रथम तर दीक्षा राजेंद्र आव्हाड ७४ टक्के गुणांनी द्वितीय आली.

बातम्या आणखी आहेत...