आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:एकमेकांना आवाज खाली करण्याचा दिला इशारा; सत्ताधारीच सदस्यांची नाराजी

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सभेत तहकूब केलेल्या विषयासंदर्भात फेरनिविदा काढण्याचा ठराव करण्यात आल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत नागसेन बोरसे यांनी केला. तर आपण विषय तहकूब केल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र आपल्याकडे फेरनिविदा काढण्याचा ठराव असल्याचे सांगत त्यांनी सभापतीवर गंभीर आरोप केले. याप्रसंगी शाब्दती वाद निर्माण झाल्याने सभागृहातील वातावरण तापले. याप्रसंगी सभापती आणि सदस्य नागसेन बोरसे यांनी एकमेकांना आवाज खाली करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच नालेसफाई निविदा, पाणीपुरत्तठा, सदस्यांकडून मांडण्यात येणाऱ्या विषयावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल सभेत सत्ताधारी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती शितल नवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपायुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य हर्ष रेलन, संजय जाधव, प्रतिभा चौधरी, साबीर शेख, भादिमा अन्सारी, किरण अहिरराव, बन्सी जाधव उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस संजय जाधव यांनी हद्दवाढ गावातील भुखंडाबाबत प्रशासनाने पंधरा दिवसात कारवाई न केल्यास पोलिसात तक्रार करण्याचा इशार दिला.

स्थायी समितीच्या सभेचे कामकाज मोबाइल बॅटरीवर
धुळे महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी दुपारी सभापती शितल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभा सुरू असतांना शहरात वादळी वाऱ्याला सुरूवात होवून पावसाळी वातावरण तयार झाले. त्यामुळे सभेत वातावरण वीजपुरवठा खंडीत होता. वीजपुरवठा खंडीत झाल्याने सदस्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरीत सभेचे कामकाज चालविले.

बातम्या आणखी आहेत...