आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरपोच आहार ; शाळेतील शिक्षकांनी  स्वखर्चाने पोहोचवला शालेय पोषण आहार

दोंडाईचा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राऊळ दौलतसिंहजी मल्टिपर्पज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दोंडाईचा या शाळेतील शिक्षण घेणारे बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या धडगाव, तोरणमाळ व तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी आपल्या स्वखर्चाने शालेय पोषण आहार घरपोच जाऊन दिला.

शाळेचे प्राचार्य डी.एन. जाधव यांच्या नियोजनानुसार धडगाव भागातील सावरीपाडा, सुरावाणी, शेलाबारपाडा, थुवानी, खडकला, नलगव्हाण आदी तळोदा तालुक्यातील गढी कोठला, रापापूर, खर्डी व तोरणमाळ भाबरी, भादल, उडद्या या नर्मदा काठावरील अतिदुर्गम पहाडी भागातील व शहादा तालुक्यातील शोभानगर, जावदा पुनर्वसन येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वखर्चाने मालवाहू गाडी करून शालेय पोषण आहार घरपोच वाटप करण्यात आला.

या आधीही कोरोनाच्या काळात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हा स्वखर्चाने गाड्या करून दुर्गम भागात जाऊन पोषण आहार व विद्यार्थ्यांना घरपोच केले होते. यात स्वतः महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. जाधव, पर्यवेक्षक एस. के. चंदणे, शिक्षक आर. जी. मोरे, एन.एस. पाटील, एन. यू. सावळे आदी शिक्षकांचा समावेश होता. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या काळजी, जाणीवबद्दल या शाळेतील शिक्षकांचे विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, केंद्रप्रमुख विकास देव्हारे, स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, मानद सचिव माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, सेक्रेटरी सी. एन. राजपूत, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, विकास अधिकारी आर. टी. गिरासे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना मिळाला हक्काचा आहार
^पोषण आहार हा प्रशासनाकडून सुटीमध्ये प्राप्त झाला. तो प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. त्यानुसार दोंडाईचा केंद्रातील राऊळ दौलतसिंहजी मल्टिपर्पज हायस्कूल व जुनिअर कॉलेज दोंडाईचा या शाळेतील प्राचार्य यांनी सुयोग्य नियोजन करून बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धडगाव, तोरणमाळ व तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या स्वखर्चाने शालेय पोषण आहार घरपोच जाऊन वाटप केला आहे. डी. एस. सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी दोंडाईचा

बातम्या आणखी आहेत...