आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:प्रामाणिकपणामुळे केला रिक्षा चालकाचा सत्कार; ऑटो रिक्षामध्ये विसरलेल्या दागिन्यांना केले पोलिसात जमा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ऑटो रिक्षामध्ये दागिने विसरलेल्या महिलेचे दागिने पोलिसांमार्फत परत करणारे रिक्षाचालक गणेश थोरात यांचा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शहरात लग्नकार्यासाठी आलेल्या जागृती पाटील या गावी जाण्यासाठी रिक्षातून बसस्थानकत आल्या. या वेळी सुमारे तीन तोळे दागिने व रोकड असलेली पर्स त्या रिक्षामध्ये विसरल्या. रिक्षाचालक गणेश थोरात घरी गेल्यावर त्यांना ही पर्स आढळली. त्यानंतर चालक थोरात यांनी लागलीच आझादनगर पोलिस ठाणे गाठून पर्स पोलिसांच्या ताब्यात दिली. बसस्थानकात पर्सची आठवण झाल्यावर जागृती पाटील यांनी रिक्षाचा शोध सुरू केला. त्यानंतर श्रीमती पाटील पोलिसांपर्यंत पोहोचल्यात. यावेळी पर्स आझादनगर पेालिसांकडे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. शिवाय ही पर्स परत करण्यात आली. त्यानिमित्त अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी गणेश थेारात यांचा सत्कार केला. या वेळी आझादनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आनंद कोकरे, सहायक उपनिरीक्षक आरिफ सय्यद आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...