आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा सत्कार:उत्कृष्ट शिक्षकांचा केला गौरव

तऱ्हाडी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै. नथू सोनजी भलकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त तऱ्हाडीसह परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

येथील नथू सोनजी भलकार यांनी सन १९६८-१९७० या कालावधीत प्राथमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी दोन एकर जमीन शाळेसाठी दान केली. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे कार्यक्रम झाला. या वेळी तऱ्हाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सुलोचना चौधरी, नवी अंतुर्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील विनोद बोरसे, भटाणे जिल्हा परिषद शाळेतील जगन्नाथ भामरे, तऱ्हाडी येथील साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयातील भावेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच जयश्री सुनील धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे, माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, अध्यक्ष तुळशीराम भामर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...