आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:आजी-माजी सैनिकांचा सत्कार, वक्तृत्व स्पर्धा

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर शहरातील एच. आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

प्राचार्य आर.बी. पाटील, पर्यवेक्षक जे. पी. पाटील, बापू रामा भील, प्रवीण मोतीलाल माळी, नामदेव नवनाथ राजपूत, प्रवीण आत्माराम सोनवणे, ब्रिजलाल पुंडलिक पाटील, धीरज मधुकर सनेर, योगेश मोरे, मिलिंद करणसिंग सिसोदिया आदी उपस्थित हाेते. प्रवीण मोतीलाल माळी, प्रवीण आत्माराम सोनवणे, सनेर धीरज मधुकर यांनी मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेत सातवी ते बारावीतील ३६ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत क्रांतिकारकांची यशोगाथा याविषयावर त्यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागप्रमुख आर. आर. रघुवंशी यांनी प्रास्ताविक केले. व्ही. सी. महाजन, एन. सी.पाटील, मीना पाकळे यांनी संयोजन केले. एस. जे. भामरे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक जे. पी.पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...