आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुमार केसरी स्पर्धा नुकतीच झाली. स्पर्धेतील विजेते, उपविजेत्या मल्लांचा एकनाथ विजय व्यायामशाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी स्पर्धेचे आयोजक व पंचांचा सत्कार करण्यात आला. कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वजन गटातून कृष्णा कोळेकर विजेता, खुशाल आव्हाड उपविजेता, ३८ किलो वजन गटातून चेतन कोळी विजेता, विक्रांत महानोर उपविजेता, ४१ किलो वजन गटातून अतिश वाकोडे विजेता, रोहित चव्हाण उपविजेता, ४४ किलो वजन गटातून कुणाल परदेशी विजेता, शायन बिग उपविजेता, ४५ किलो वजन गटातून शुभम पाटील विजेता तर समीर शेख उपविजेता, ४८ किलो वजन गटातून हर्ष देवरे विजेता, रोहन कढरे उपविजेता, ५१ किलो वजनगटातून चिरंजीवी सांगळे विजेता, सिद्धार्थ वाघ उपविजेता, ५५ किलो वजनगटातून युवराज शिंदे विजेता, करण रणधीर उपविजेता, ६० किलो वजन गटातून पुरुषोत्तम विसपुते विजेता, तरुण चित्ते उपविजेता, धुळे जिल्हा कुमार केसरी गटातून ७५ ते ८० किलो गटात दर्शन गर्दे विजेता तर अंजुम खाटीक उपविजेता ठरला. सर्व मल्लांचा एकनाथ विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष संजय शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रथम आलेल्या मल्लांना प्रत्येकी एक हजार व उपविजेत्यांना पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या वेळी तालीम संघाचे उमेश चौधरी, सुनील चौधरी, पंच त्रिलोक गुंडलेकर, सचिन कराड, गणेश फुलपगारे, प्रवीण जाधव, श्याम कानडे, पवन चौधरी, संजय चौधरी, गोरख पाटील, विनायक काकडे, दिलीप जगताप, सोनू गीते, शरद (बंडू) पाटील, काका कोळी, ईश्वर भदाणे, भिकन चौधरी, कृष्णा चौधरी यांचा सत्कार एकनाथ विजय व्यायाम शाळेचे मल्ल सुरेश खोपडे, राजू जिरेकर, मुरलीधर लोकरे, गोविंद साखला, संजय शेंडे, सुधीर लिंगायत, रमेश शिरसाठ, शंकर गवळी, दिलीप बाबर, संजय वाडेकर, गोरख येरडावकर, अकबर बेग, बाळू पाटोळे यांच्या हस्ते झाला.
कुमार केसरी स्पर्धेचे आयोजक सचिन बडगुजर यांचाही सत्कार झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष संजय शेंडे, अशोक कोरे, उदय गवळी, अनिल सुडके, सनी लोकरे, पूतन विभुते, बंटी शेवतकर, वसंत लाडे, सचिन शेवतकर, उल्हास खोपडे, मुन्ना बनछोड, संजय मेकले, सचिन विभूते, मयूर कंड्रे, सुनील जिरेकर, नैनेश साळुंखे, अशोक मंगीडकर, अशोक घाटोळे, राजेंद्र लिंगायत, समीर गवळी, संजय दहिहंडे, प्रशांत चोळके, चेतन गवळी आदींनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.