आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:हद्दवाढीच्या क्षेत्रात घंटागाडीचे दर्शन होतेय चार दिवसांनंतरच

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागातील कचरा संकलनासाठी महापालिकेने ठेकेदार नेमला आहे. विविध भागात घंटागाडी नियमित येत असली तरी हद्दवाढीच्या भागात तीन ते चार दिवसांनंतरच घंटागाडी येत असल्याने नागरिकांना कचरा घरात जमा करून ठेवावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याविषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

शहरातील कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्याचा ठेका महापालिकेने स्वयंभू संस्थेला दिले आहे. घंटागाड्या पुरेशा असल्याने प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी येणे अपेक्षित आहे. मात्र, हद्दवाढीच्या भागातील वलवाडी परिसरातील वसाहतीमध्ये घंटागाडी चार दिवसांनंतरच येते. त्यामुळे नागरिकांना चार दिवस घरात कचरा ठेवावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...