आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू:मनमाड ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी‎ शंभर काेटींचा निधी; भूसंपादन हाेणार‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा पहिला‎ टप्पा मानला जात असलेल्या‎ बाेरविहीर ते नरडाणा या नवीन रेल्वे‎ मार्गासाठी शंभर काेटींची तरतूद‎ अर्थसंकल्पात करण्यात आली‎ आहे. यामुळे भूसंपादन लवकर‎ हाेण्यास मदत हाेणार आहे.‎ सद्य:स्थितीत या मार्गासाठी जमीन‎ माेजणीची प्रक्रिया राबवली जात‎ आहे. ती पूर्ण झाल्यानंतर‎ भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात‎ हाेणार आहे. निधीबाबत खासदार‎ डाॅ. सुभाष भामरे यांच्याकडूनही‎ दुजाेरा दिला गेला आहे.‎ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर‎ झाल्यानंतर सदर कामासाठी आता‎ निधीची प्रतीक्षा आहे. रेल्वे‎ विभागाने या मार्गाच्या पहिल्या‎ बोरविहीर ते नरडाणापर्यंतचे काम‎ हाती घेतले आहे. यात जमिनीच्या‎ भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.‎

मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी‎ अद्यापही मोठ्या प्रमाणावर निधीची‎ गरज आहे. नुकत्याच जाहीर‎ झालेल्या अर्थसंकल्पात या ५०.६‎ किलोमीटर अंतराच्या कामासाठी‎ १०० कोटींची तरतूद करण्यात आली‎ आहे. या निधीमुळे जमीन‎ माेजणीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया‎ वेगाने करणे शक्य हाेणार आहे.‎ टप्प्याटप्प्याने या साठी निधी‎ उपलब्ध हाेणार असल्याची माहिती‎ खासदार डाॅ. भामरे यांनी दिली.‎ तसेच यासंदर्भात त्यांनी दुजाेराही‎ दिला आहे.

तर दुसरीकडे‎ मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे स्वप्न‎ अनेक वर्षांपासून दाखवले जात‎ आहे. त्यासाठी दहा हजार काेटी‎ रुपयांची गरज असताना पहिल्या‎ टप्प्यात केवळ ३६८ किलाेमीटरपैकी‎ तीस किलाेमीटरच्या टप्प्याचे काम‎ हाती घेतले गेले आहे. नरडाणा‎ रेल्वेसाठीही शंभर काेटी हा तुटपुंजा‎ निधी मंजूर केला आहे. ही थट्टाच‎ असल्याचे संघर्ष समितीचे मनाेज‎ मराठे यांनी म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...