आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नटवाडे येथील बेपत्ता असलेल्या पत्नीचा आपल्या काकासोबतच अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीस २४ तासात शिरपूर पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती दिली.
नटवाडे येथील सुनील रुलसिंग पावरा याने दि.१३ मे रोजी पत्नी निर्मला पावरा ही बेपत्ता असल्याची तक्रार शिरपूर पोलिसांत दिली. दि. २९ रोजी पत्नी निर्मला ही कन्नड घाटाजवळ एका झोपडीत आपल्या काकासोबत राहत असल्याची माहिती सुनीलला मिळाली. तो लागलीच आपल्या मोटारसायकलने तिथे पोहचला. त्याने पत्नी निर्मला हीचा शोध घेऊन तिला विश्वासात घेतले. ती त्याच्यासोबत गाडीवर आपल्या घरी येण्यास तयार झाली. त्याने तिला शिरपूरला गाडीवर आणले. दि.३० मे रोजी रात्री उशिरा कन्नड येथून नटवाडे येथे पोहचलेल्या सुनीलने करवंद ते नटवाडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यास लागून रमेश रजन पावरा याच्या शेतालगत असलेल्या चारीमध्ये पत्नी निर्मला हिच्या डोक्यात दगड टाकून ठेचून निर्घृण हत्या केली. या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी सुनीलने निर्मलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या शरीराला जाळण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पळून घरी गेला.
दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील पोलीस पाटील प्रकाश पावरा यांनी नटवाडे येथे एका महिलेचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या महिन्याभराच्या बेपत्ता महिलांच्या नोंदी घेतल्या. यात दि. १३ रोजी सुनील पावरा याने आपल्या पत्नीची बेपत्ता झाल्याची नोंद सापडली. शिरपूर पोलिसांनी त्या दिशेने तपास करताच गुन्ह्याचे सर्व तार जुळत गेले. सुनील पावरा आणि त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांची स्वतंत्रपणे चौकशी केल्यानंतर पती सूनीलनेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस नाईक रुपेश गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून सुनील पावरा याच्यावर कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, एपीआय गणेश फड, पीएसआय किरण बाऱ्हे, संदीप मुरकूटे, गणेश कुटे, छाया पाटील, हेडकॉन्सटेबल ललित पाटील, प्रेमसिंग गिरासे, पंकज पाटील, भरत चव्हाण, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, प्रशांत पवार, मुकेश पावरा मनोज दाभाडे, लादुराम चौधरी, उमाकांत वाघ, रुपेश गांगुर्डे,संदीप ठाकरे, अनिता पावरा, जितेंद्र मालचे, रवींद्र महाले यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.