आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहआरोपी:बोगस डॉक्टरांना रोखले नाही तर सहआरोपी करू ; तर प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्याचा इशारा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोगस डॉक्टरांची यादी आरोग्य यंत्रणेकडे आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने धडक मोहीम राबवत बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा जिल्हा प्रशासनाला हे प्रकरण विशेष चौकशी पथकाकडे सोपवावे लागेल. त्या वेळेस आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिला. बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, औषध निरीक्षक देशमुख, समितीचे अशासकीय सदस्य अॅड.चंद्रकांत येशीराव, डॉ. योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी आरोग्य विभागाने किती कारवाया केल्या याची माहिती घेतली. अॅड. येशीराव यांनी ‘दिव्य मराठी’चा अंक सभेत झळकावला. तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईनंतर आरोग्य यंत्रणेला वेठीस धरण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर गायकवाड म्हणाले की, बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने आरोग्य विभागाला सहकार्य करावे. या वेळी निरीक्षक बोराडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना पत्र देण्यात येईल असे सांगितले. डॉ. सूर्यवंशी यांनी बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या जास्त असल्याचे ते म्हणाले.

कारवाईचा अहवाल द्यावा ज्या ठिकाणी तक्रारी आहे तेथे कारवाई करावी. आरोग्य विभागाने कारवाई करण्यासाठी जाताना अन्न व औषध प्रशासनाच्या प्रतिनिधींना सोबत न्यावे, अशी सूचना झाली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...