आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी व्यक्त:सवलतीचे गुण हवे असतील तर प्रस्ताव छाननीसाठी द्यावे लागणार 50 रूपये

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना कला, क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवल्यावर ग्रेस गुण दिले जातात. ते मिळवण्यासाठी दाखल प्रस्तावाची छाननी करण्यासाठी आता प्रत्येक विद्यार्थ्याला ५० रुपये छाननी शुल्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे जमा करावे लागेल. या निर्णयामुळे शारिरीक व कला शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लोककला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंसह एनसीसी, स्काऊट आणि गाइडच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परिक्षेत ग्रेस गुण देण्यात येतात. या गुणांसाठी शाळा व शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव सादर केला जातो. या प्रस्तावाची छाननी करणे, प्रस्तावात त्रुटी असल्यास ती दुर करण्यासाठी शिक्षणाधिकारी व क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा लागतो. त्यासाठी रोजंदारी कर्मचारी कामाने लावावे लागतात, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ग्रेस गुणांसाठी ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर होतील. त्या विद्यार्थ्यांकडून शाळांनी प्रती विद्यार्थी ५० रुपये छाननी शुल्क घ्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. हा आदेश २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...