आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या आरोग्य विभागात विविध जागा भरल्या जाणार आहे. या जागांवर राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शन करण्यात आली. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा या वेळी देण्यात आला. महापालिकेत राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर डाॅक्टर, फार्मासिस्ट, नर्स, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, लिपीक सन २०१४ पासून मानधनावर कार्यरत आहे. सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असून कोविड काळात सर्वांनी जीवावर उदार होत रुग्णसेवा केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने राष्ट्रीय आराेग्य याेजनेतंर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले अाहे.
महापालिकेला आरोग्य विभागात पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या जागांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्राधान्य द्यावे, कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नाही तर न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा डाॅ. साेनल वानखेडे, डाॅ. प्रिती अग्रवाल, डाॅ. प्रशांत मराठे, डाॅ. अर्चना अागळे, डाॅ. सुरज पावरा, लेखा व्यवस्थापक हर्षाली चाैधरी, पूनम जयस्वाल, नम्रता पावटे, सुमित चाैधरी, सलमाबानाे अन्सारी, कल्याणी गावीत, श्वेता कदम, रंजिता पावरा, भारती मासुळे, ज्याेती कदम, सुरेखा कांबळे, दिप्ती घुगे, प्रियंका वसावे, प्रियंका सूर्यवंशी, विशाखा पाखले, मीनाक्षी वाघ आदींनी दिला आहे. या वेळी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.