आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:बालविवाह रोखण्यासाठी शिक्षकांनी‎ पुढाकार घेतला तर समस्या सुटणार‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी‎ शिक्षकांनी समाजात जनजागृती करणे‎ आवश्यक आहे. आदर्श समाज‎ घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये‎ असल्याने त्यांनी ही जबाबदारी‎ स्वीकारावी, अशी अपेक्षा जिल्हा‎ परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी‎ बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केली.‎ महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक‎ संघटना व पुरोगामी महिला मंचतर्फे‎ महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट‎ कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार झाला.‎ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण‎ सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा‎ परिषदेचे शिक्षण सभापती महावीरसिंह‎ रावल अध्यक्षस्थानी होते. या वेळी‎ आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे‎ उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महापौर प्रतिभा‎ चौधरी, माजी कृषी सभापती अरविंद‎ जाधव, माजी महापौर जयश्री अहिरराव,‎ माजी कृषी सभापती संग्राम पाटील,‎ शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी‎ सी. के. पाटील, साक्रीचे‎ गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, पुरोगामी‎ शिक्षक संघटनेच्या महिला आघाडीच्या‎ राज्य कोषाध्यक्षा रुख्मा पाटील, शिक्षण‎ विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे, प्रा. हेमंत‎ पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा‎ परिषदेच्या मुख्य कार्यकारी बुवनेश्वरी‎ एस म्हणल्या की, समाजामध्ये‎ शिक्षकांच्या शब्दाला मोठा मान आहे.‎ त्यामुळे शिक्षकांनी बालविवाह‎ थांबवण्यासाठी समाजात जागृती‎ करावी.

बालविवाह होत असल्यास‎ त्याची माहिती प्रशासनाला द्यावी.‎ शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे‎ आश्वासन या वेळी त्यांनी दिले.‎ आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की,‎ शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना‎ घडवण्याचे काम शिक्षक करतात.‎ महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना‎ सुशिक्षित व सुसंस्कृत घडवण्यासाठी‎ पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या.‎ प्रा. हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त‎ केले. सुनीता चौधरी व स्मिता पाटील‎ यांनी सूत्रसंचालन केले. दीपा मोरे‎ यांनी प्रास्ताविक केले. भारती भदाणे‎ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष‎ भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषीकेश‎ कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले,‎ विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी,‎ सचिव रवींद्र देवरे, रवींद्र सैंदाणे,‎ बाबासाहेब बढे, कमलेश चव्हाण,‎ न्हानू माळी, उपाध्यक्ष कैलास‎ सोनवणे, गोकुळ पाटील, किरण‎ चौधरी, मुरलीधर नानकर, प्रतिभा‎ वाघ, सुरेखा बोरसे, रंजना राठोड,‎ उपाध्यक्ष संगीता ठाकरे, वैशाली‎ बच्छाव, तालुकाध्यक्षा सुमन साळुंके,‎ सरचिटणीस भारती भदाणे,‎ कार्याध्यक्ष जयश्री बोरसे, कोषाध्यक्ष‎ प्रणिती पाटील, प्रमुख संघटक स्मिता‎ पाटील, हनुमान दास बैरागी, दीपक‎ कुवर, गौतम बाविस्कर, अशोक‎ बडगुजर, सतीश आखडमल,‎ भागवत चौधरी, मनोज परदेशी‎ आदींनी प्रयत्न केले.‎

उत्कृष्ट कार्य केल्याने गौरवले
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिका व पदोन्नती प्राप्त‎ मुख्याध्यापिकांचा ज्ञानज्योती पुरस्कार, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा शिक्षण गौरव पुरस्कार आणि विविध‎ क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा समाजरत्न पुरस्कार देत गौरव झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य‎ कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, महापौर प्रतिभा चौधरी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती‎ धोडमिसे यांना पुरोगामी रत्न पुरस्कार देण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...