आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:क्रीडा स्पर्धांचे प्रमाणपत्र वेळेत मिळाले‎ नाही तर ग्रेस गुणही सापडणार वांध्यात‎

अमोल पाटील | धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका व‎ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात‎ आल्या. या स्पर्धा होऊन मोठा‎ कालावधी लोटला तरी अद्याप स्पर्धेत‎ विजयी व सहभागी झालेल्या खेळाडूंना‎ प्रमाणपत्र मिळालेले नाही. दहावी,‎ बारावीच्या विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राच्या‎ आधारे ग्रेस गुण दिले जातात. खेळाडूंना‎ वेळेत प्रमाणपत्र मिळाले नाही तर ते‎ गुणांपासून वंचित राहण्याचा धोका‎ असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली‎ आहे.‎ यंदा शालेय क्रीडा स्पर्धेच्या‎ नियोजनाविषयी गोंधळाची स्थिती होती.‎ मोठ्या विलंबाने शासनाने स्पर्धा‎ घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार ऑगस्ट‎ महिन्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या.‎ या स्पर्धा शाळा, तालुका व‎ जिल्हास्तरावर झाल्या.‎

तालुकास्तरावरील स्पर्धेत एक ते दीड‎ हजार तर जिल्हास्तरावरील स्पर्धेत एक‎ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.‎ जिल्हास्तरीय स्पर्धा संपल्या आहे.‎ दुसरीकडे जिल्हास्तरावरून‎ विभागीयस्तरावर पात्र ठरलेले व‎ राज्यस्तरावर पात्र ठरलेल्या‎ खेळाडूंच्या आता विभागीय आणि‎ राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहे. तालुका व‎ जिल्हास्तरीय खेळाडूंच्या आता‎ विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू‎ आहे. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत‎ यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या‎ खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी‎ कार्यालयाकडून अद्यापही प्रमाणपत्र‎ मिळालेले नाही. या प्रमाणपत्राच्या‎ आधारे दहावी आणि बारावीतील‎ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळतात.‎ बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू‎ होतील. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र‎ मिळाले नाही तर विद्यार्थी ग्रेस गुणांना‎ मुकण्याची शक्यता आहे.‎

किती मिळतात गुण‎
शासन निर्णयाप्रमाणे सहावी ते दहावी किंवा‎ सहावी ते बारावीपर्यंत क्रीडा स्पर्धेत सहभाग‎ नोंदवलेल्या खेळाडूला जिल्हास्तरावरील‎ प्रावीण्यासाठी ५ गुण, विभागस्तरावरील‎ प्रावीण्यासाठी १० गुण, राज्यस्तरावरील‎ प्रावीण्यासाठी १२ ते १५ गुण, राष्ट्रीयस्तरावरील‎ प्रावीण्यासाठी २० गुण तर‎ आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रावीण्यासाठी‎ सवलतीचे २५ गुण दिले जातात. कोरोना‎ कालावधीत दहावी-बारावीतील‎ सहभागाऐवजी आठवी, नववी व‎ अकरावीतील सहभाग गृहीत धरून खेळाडूंना‎ सवलतीचे गुण मिळाले. तसेच दोन वर्ष स्पर्धा‎ झालेल्या नाही.

चालू वर्षी खेळाडूंना गुण‎ मिळणार असून त्यासाठी शाळेच्या‎ माध्यमातून शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव वेळेत‎ सादर होणे आवश्यक आहे. तसे झाले तर‎ विद्यार्थ्यांना लाभ होईल.‎

त्या खेळाडूंनाही प्रतीक्षा‎
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त‎ सायकल, मॅरेथॉनसह मैदानी स्पर्धा‎ झाली. सायकल व मॅरेथॉन स्पर्धेत‎ सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र‎ मिळाले पण मैदानी स्पर्धेत सहभागी‎ ८०० खेळाडूंना प्रमाणपत्र व‎ पारितोषिकाची रक्कम मिळालेली‎ नाही. या स्पर्धा होऊन आठ महिने‎ झाले आहे.‎

विभागाकडे पाठपुरावा‎
जिल्ह्यात तालुका व जिल्हास्तरीय‎ क्रीडा स्पर्धा झाल्या आहे. पण‎ अद्याप खेळाडूंना प्रमाणपत्र मिळाले‎ नाही. प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही‎ तर खेळाडूंचे नुकसान होऊ शकते.‎ प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे‎ यासाठी पाठपुरावा सुरू आहे.-‎ डॉ. आनंद पवार, राज्य उपाध्यक्ष,‎ क्रीडा शिक्षक महासंघ‎

का झाला प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विलंब‎
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राष्ट्रीय पातळीवर पेच निर्माण‎ झाल्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. एकाच वेळेस सर्व स्पर्धा सुरू‎ झाल्या. त्याचबरोबर तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धा संपत नाही तोच‎ विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन सुरू झाले. तसेच आता शहरात‎ खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्यामुळे क्रीडा विभागाचे‎ अधिकारी या स्पर्धेच्या नियोजनात गुंतले आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र‎ वितरणास विलंब होतो आहे.‎

पर्यवेक्षीय‎ अधिकाऱ्यांना‎ करणार सूचना
तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्यावर कामाचा व्याप वाढला. पर्यवेक्षीय‎ अधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र काढून ते खेळाडूंना देण्याचे आदेश दिले आहे. सर्व‎ खेळाडूंना मुदतीत प्रमाणपत्र मिळतील. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत‎ प्रमाणपत्र वितरित करावे. - आसाराम जाधव, जिल्हा क्रीडाधिकारी‎

बातम्या आणखी आहेत...