आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाची गती:मंत्र्यांनी मदत केली तर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आणू

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीमुळे विकासाची गती मंदावली होती. उर्वरित अडीच वर्षांत कामांना वेग दिला जाईल. मंत्री डॉ. विजयकुमार गावित व पालकमंत्री गिरीश महाजन या दोन्ही मंत्र्यांनी मदत केली तर जिल्ह्यातून पाचही आमदार भाजपचे निवडून आणू, असे प्रतिपादन आमदार अमरीश पटेल यांनी केले.

येथील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानात पालकमंत्री गिरीश महाजन व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सोमवारी सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत हाेते. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी हाेते. आमदार अमरीश पटेल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार जयकुमार रावल, काशिराम पावरा, राजेश पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉॅ. तुषार रंधे, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, महापौर प्रदीप कर्पे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा आदी उपस्थित होते आमदार पटेल म्हणाले की, आदिवासी भागातील धरणांची दुरुस्ती करण्यासाठी वनविभागाकडून तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे शासनाने धोरणात बदल करून धरणाचा गाळ काढायला परवानगी द्यावी. आदिवासी विकास विभागाचे कार्यालयात तालुक्यात व्हावे. जात पडताळणीच्या कामात सुलभता आणावी, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आदिवासी विकास कार्यालय करू : गावित
मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, अमरीशभाई जेवढा पैसा तालुक्यात शिक्षणावर खर्च करतात, तसा राज्य सरकार खर्च करते मात्र त्या कामांचा दर्जा फारसा नसतो. अमरीशभाई यांनी सुरू केलेल्या आश्रमशाळा पाहून राज्यभरात अशा आश्रमशाळा करण्याचे नियोजन आहे. धरणातील गाळ काढण्याचे काम करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर शिरपूर तालुक्यात आदिवासी प्रकल्प विभागाचे कार्यालय सुरू केले जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सुलवाडे-जामफळ योजनेचे काम दोन वर्षांत : मंत्री महाजन
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामामुळे जिल्ह्यासह शिरपूर तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. सुलवाडे-जामफळ धरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण करू. आमदार अमरीश पटेल यांच्यासारखे नेते कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी विजयी होतील. ते मागणारे नाही तर देणारे नेते आहे. अमरीशभाई भाजपमध्ये आल्यावर भाजपची शक्ती धुळे-नंदुरबार जिल्ह्यात वाढल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...