आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पथदिवे सुरू केले नाही तर टोल बंद आंदोलन करणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीत अवधानचा समावेश झाला असून, या भागात औद्योगिक वसाहत आहे. या भागातील पथदिवे बंद आहे. परिसरात रात्री नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने ८ दिवसांत परिसरात पथदिवे न लावल्यास टोल बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक १८च्या नगरसेविका सारिका अग्रवाल यांनी दिला आहे. याविषयी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली, अवधानपासून लळिंगपर्यंत असलेले सर्व्हिसरोड, मेनरोडवर रहदारीचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावरील पथदिवे पाच वर्षांपासून बंद आहे. काही दिवसांपूर्वी पहाटे दोन जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात आठ दिवसांत पथदिवे लावावे. तसे झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...